Maharashtra News:औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.
औरंगाबाद येथील रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला होता.
त्यानंतर आलेल्या सरकारने तो रद्द केला आणि नव्याने निर्णय घेतला. त्यानुसार औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात येणार आहे. त्यालाच आता हरकत घेण्यात आली आहे.