ताज्या बातम्या

गुगलची करामत, देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत केले असे….

Maharashtra News:गुगल मॅपच्या मदतीने रस्ता शोधण्यासाठी गेलेल्यांना भलत्याच वाटेला घेऊन जाण्याचा प्रताप अनेकदा गुगलच्या बाबतीत घडतो.

आता भाजपचे फायर बॉण्ड नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत तर गुगलकडून भलतीच करामत झाली आहे.

गुगलवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाकून सर्च केल्यावर ‘उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री’ अशी माहिती समोर येते. गुगलकडून काहीतरी चूक झाल्यानं हा प्रकार घडला असावा. या चुकीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. गुगलवरही पूर्वी तसा उल्लेख येत होता. मात्र कालपासून काही तरी चूक झाल्याने असे होत असल्याचा अंदाज आहे.

यावरून नेटकऱ्यांकडून मात्र गमतीशीर प्रतिक्रिया उमटत आहेत. गुगलची ही तांत्रिक चूक असून अशा अनेकदा घडतात आणि नंतर त्या दुरूस्तही होतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts