मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्लाबोल केला आहे, यावेळी त्यांनी ‘भाग सोमय्या भाग’ हा नवीन सिनेमा (Film) आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यावर आता भाजपने खुलासा केला पाहिजे. तो आता सांगतो मी पक्षाकडे पैसे जमा केले. मग 13 वर्ष झोपला होता का? आता किरीट सोमय्यांबरोबर भाजपला (BJP) गुन्हेगार ठरवायचे का? हे आता सरकारला ठरवावे लागेल.
तेव्हाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण होते? खजिनदार कोण होते? हा सगळा तपासाचा भाग झाला. म्हणजे भाजप आणि सोमय्यांनी मिळून हा घोटाळा केला का? ही मन की बात लोकांच्या मनात आली तर काय कराल? मी म्हणत नाही.
सोमय्यांनीच कोर्टाला (Court) सांगितलं. हा देशद्रोह आहे, असं सांगतानाच १३ वर्ष पैसा वापरला. त्याचा हिशोब भाजपला द्यावा लागेल. ते आता जातीलच पण त्यांनी भाजपचेही रहात बुडताना पकडले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढला पाहिजे. जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता, घाबरत नाही म्हणता, इतरांना त्याच्या भ्रष्टाचारावरून प्रश्न विचारता, कायद्याला कोर्टाला सामोरे जा म्हणता मग तुम्ही का पळता? तुम्ही कशाला पळता? कायद्याचं पालन करण्याचं ज्ञान देता मग कशाला पळता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.