महापालिका नवे आयुक्त हजर झालेच नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून मनपा पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत होती.

मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते मंगळवारी हजर होणार होते, परंतु काही कारणांमुळेे ते हजर झाले नाहीत.

तत्कालीन आयुक्त मायकलवार ३१ डिसेंबरला निवृत्त झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

नगरविकास विभागाने १२ फेब्रुवारीला आयुक्तपदावर गोरे यांची नियुक्ती केली. नियुक्तीनंतर ते हजर होतील की नाही,

याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच गोरे मंगळवारी हजर होतील अशी चर्चा होती. परंतु ते हजर झाले नाहीत.

दरम्यान, महापालिकेतील राजकारण आणि डबघाईच्या स्थितीमुळे अनेकजण नगरला येणे टाळण्याचा प्रयत्न करतात.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts