ताज्या बातम्या

“शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही, घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ”; सदाभाऊ खोतांचा अर्थसंकल्पवरून टोला

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. यामध्ये काल अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. विरोधी पक्षाकडून अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात येत आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही टीका केली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) सादर केलेले बजेट हे म्हणजे “घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ” अशा पद्धतीने हे आजचं बजेट सादर झालं आहे असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

शेतकऱ्यांना (Farmer),शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही. 50 हजार रुपये मागच्या शेतकऱ्यांना पैसे देऊ म्हणून घोषणा केली. पण ते कधी मिळणार अजून माहिती नाही.

दोन लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांना काय देणार या सर्व बाबींवर सरकार काहीही बोलेल नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले. वीज बिलाच्या मुद्यावर सरकारनं काही म्हटलेलं नाही असेही सदाभाऊ खो म्हणाले आहेत.

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, दुसऱ्या बाजूला वीज माफी दिली पाहिजे होती पण वीज बिलाबाबत सरकार काहीही बोललेल नाही. सोन्या वरचा टॅक्स कमी केलं, बिल्डरांच्या खरेदी व्यवहारावर चे टॅक्स कमी केले.

परंतु डिझेल पेट्रोलचा टॅक्स कमी केला नाही. या राज्यातल्या शेतकऱ्यांना काही दिलं नाही. या राज्यातल्या बारा बलुतेदारांना काही दिले नाही. राज्यातल्या धनगर, माळी, ओबीसीसमाज यालाही काही दिलेलं नाही.

म्हणजे कोणत्याही प्रकारचा दिलासा या राज्यातल्या जनतेला देण्याचे काम या सरकारने केलेले नाही, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) तोंडाला तर पानेपुसली. सध्या एसटी बंद आहेत पहिल्या जुन्या एसटी गाड्या सडायला लागलेल्या आहेत आणि नवीन 3000 एसटी आम्ही गाड्या खरेदी करणार म्हणजे

परत हे या माध्यमातून कमिशन खायला मोकळे. असा हा दिशाहीन आणि भरकटलेला अर्थसंकल्प आहे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts