अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021:- सोशल मीडियाचा वाढता वापर अनेकदा चुकीच्या कामासाठी केला जातो आहे. याचाच परिणाम म्हणजे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असते.
असाच काहीसा प्रकार संगमनेरात झाला आहे. नुकतेच एका धर्मगुरुच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्टमुळे संगमनेरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. एका समाजाच्या जमावाने शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी करत ठिय्या दिला आहे.
ही माहिती तालुक्यात वार्यासारखी पसरली. त्यानंतर तालुक्यातूनही काही लोक पोलीस ठाण्यात आले. तेथे आल्यानंतर जमावाने एकच घोषणाबाजी केली. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी मागणी त्यांनी केली.
जमावाचा आक्रोश पाहता मोठ्या संख्यने पोलीस पथक ठाण्यात दाखल झाले. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत होता.
त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु केले.
सदर सोशल मीडियावरील अकाऊंटला 17 व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना एका व्यक्तीने टॅग केले आहे. तेही नावे पोलीस अधिकार्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात? याकडे जमावाचे लक्ष लागले आहे.