Shirdi News :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांनी स्वत: ट्विट करून दिली माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
शिर्डीत या आठवड्यात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट सरल्यानंतर आलेल्या या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ ते गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे.
या उत्सवाच्या तोंडावरच अध्यक्ष काळे यांना विलगिकरणात जाण्याची वेळ आली आहे. काळे यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती.