महसूलमंत्री म्हणाले…केंद्रांनी केलेले कायदे हे शेठ लोकांकरिता

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कृषी विरोधी कायद्याविरोधात देशात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या कायद्याला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे.

याच अनुषंगाने बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. शेतकरी हा धर्म आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे हे ‘शेठ’ लोकांकरिता आहेत. त्यामुळे पंजाबच्या शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन उभे केले. याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी.

असा टोला देखील थोरात यांनी लगावला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी व अहमदनगर जिल्हा किसान काँग्रेस यांच्यावतीने अहमदनगर येथे जिल्हा किसान काँग्रेस च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व संकल्प अभियान या कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष विक्रम नवले हे कर्तृत्ववान असून किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता उत्तम काम करतील.अशी ग्वाही महसूलमंत्री थोरात यांनी यावेळी दिली. देशातील शेतकऱ्यांपुढे असंख्य प्रश्न उभे आहेत. किसान काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मिळालेली आहे.

त्याचा फायदा घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना सुटसुटीत सातबारा मिळणार आहे.अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts