करोनाची साखळी तोडण्यासाठी महसूलमंत्र्यांनी सुचविला उपाय म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करणे गरजेचे असून प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून गावोगावी लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

नामदार थोरात यांनी चंदनापुरी व बोटा येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत त्यांना धीर दिला, यावेळी विविध सुविधांची पाहणी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, लोकसहभाग व प्रशासनाच्या समन्वयातून बोटा व चंदनापुरी येथे झालेले कोव्हिड केअर सेंटर हे इतरांसाठी आदर्शवत असून करोना किंवा इतर कोणत्याही आजाराचे लक्षणे असले तरी त्या व्यक्तीला तातडीने स्वतंत्र ठेवा.

दरम्यान थोरात यांनी ग्रामआरोग्य सुरक्षा समितीच्या सदस्यांशी संवाद साधून घरोघर तपासणीसाठी येणार्‍या अडचणी समजून घेत काही सूचना केल्या.

यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, आर. बी. रहाणे, विजय राहणे, तुळशीनाथ भोर, सुहास आहेर, सुहास वाळुंज,

बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts