नौकराने मालकाला लावला चुना; 33 लाख घेऊन झाला फरार

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवर राहणार्या एका व्यावसायिकाला त्याच्याच नोकराने बँकेत भरण्यासाठी दिलेली 30 लाखांची रोकड व पुण्यातील एका सुवर्ण कारागिराला देण्यासाठी 75 ग्रॅम सोने घेऊन दिलेले काम न करता फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि.5) घडली आहे.

व्यवसायिक संतोष सोपान बुराडे (वय 59 रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क करून गुरूवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. नोकर नवनाथ अनिल केरूळकर (रा. शेंडी पोखर्डी ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, व्यवसायिक बुराडे यांच्याकडे नवनाथ केरूळकर नोकर म्हणून कामाला होता. बुराडे यांनी त्याच्याकडे गुरूवारी सकाळी प्रवरा सहकारी बँकेच्या नगर शाखेत भरणा करण्यासाठी 30 लाख रूपये दिले होते. तसेच 75 ग्रॅम सोन्याचा तुकडा दिला होता.

बँकेतील काम झाल्यानंतर तो सोन्याचा तुकडा पुणे येथील सोन्या मारूती चौकातील सोन्याचे दागिणे तयार करणारे कारागिर नीलेश सोनी याला देवून येण्याचे सांगितले होते. केरूळकर पैसे व सोन्याचा तुकडा घेऊन गेल्यानंतर बुराडे यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. केरूळकर याचा मोबाईल बंद होता.

शेवटी बुराडे यांनी पोलिसांशी संपर्क साधून फसवणूक झाल्याचे सांगितले. 30 लाख रोख, तीन लाख 67 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा तुकडा अशी 33 लाख 67 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts