Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) केंद्रीय निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिले. त्यामुळे आता मशाल आणि ढाल-तलावर अशी शिवसेनेच्या दोन्ही गटांत लढत होणार आहे.
काल शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या चिन्हाच्या तीनही पर्यायांना बाद करण्यात आले होते. तर त्यांना दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते.
चिन्हांचा पर्याय देण्यासाठी शिंदे गटाला आज सकाळी दहा पर्यंतची वेळ दिला होता. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तळपता सुर्य, ढाल तलवार, पिंपळाचं झाड ही तीन चिन्ह देण्यात आली होती.