अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे अद्यापही बंद आहे.
तर काही नुकतेच बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. यातच भाजीपाला व फळ विक्री संदर्भात अद्यापही कडक निर्बंध लागू आहे.
याच अनुषंगाने किराणा, भाजीपाला व फळ विक्री संदर्भात निर्बंधाचा आदेश मागे घेण्यासाठी आयुक्तांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळ, संजय झिंजे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे.
यामुळे गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, कडक निर्बंध हे लागू करण्यात आले आहे. काही काळासाठी हे नियम शिथिल करण्यात आले होते.
मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे गेल्या महिनाभरापासून दुकानं बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.