ताज्या बातम्या

“भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मोदीच निवडून येणार”; चंद्रकांत पाटलांचा यूपीए अध्यक्षपदावरून टोला

मुंबई : राज्यात सध्या यूपीए अध्यक्षपदावरून घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (Nationalist Youth Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचे (UPA) अध्यक्षपद देण्यात यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधकांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली

तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाविरोधी (BJP) पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. पण भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे.

त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे घटकपक्ष एकत्र राहिले असले तरी त्यांच्यातील विसंवाद सतत समोर येत आहे.

काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या 25 आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले.

प्रशासनाची वाताहत झाली आहे. अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या नेमणुकीवर केंद्र सरकारमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काहीजण शिष्यवृत्ती मिळवून प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या धडपडीत आहेत.

या सगळ्यात जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. एसटीचा संप, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या सोडविल्या जात नाहीत, अशी टीका पाटील यांनी केलीय.

तसंच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. भाजपा ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकेल असेही ते म्हणाले.

Renuka Pawar

Recent Posts