अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनापेक्षाही खतरनाक रोगाची साथ येणार आहे.
कोरोनाच्या विषाणूपेक्षाही वेगाने संसर्ग पसरवण्याची क्षमता या नव्या रोगाच्या विषाणूमध्ये असल्याचे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयिसस यांनी सांगितले आहे.कोरोना विषाणूने आधीच जग हैराण असताना या नव्या विषाणूच्या इशाऱ्यामुळे ‘टेन्शन’ वाढले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेची ७४ वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्या सभेच्या उद्घाटनपर भाषणात टेड्रोस यांनी हा इशारा दिला. या सभेला जगातील १९४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनामुळे धोकादायक बनलेली परिस्थिती अजूनही कायम असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले.
सर्वात कमजोर लोकांना वाचवणे हा विषाणूवर विजय मिळवण्याचा एकमेव उपाय असल्याचे टेड्रोस याप्रसंगी म्हणाले.
सर्वात कमजोर असलेल्या लोकांना सर्वात आधी मदत पोहोचवून त्यांना मजबूत केले तर आपल्या सर्वांचा निश्चितच विजय होईल असे ते म्हणाले. जगातील गरीब देशांना कोरोनाविरुध्द लढण्यासाठी मदत पुरवण्याची गरज असल्याचे संकेत त्यांनी त्यातून दिले.