ताज्या बातम्या

Anti Diabetic Drinks : मधुमेही रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जातात ‘हे’ आयुर्वेदिक पेय, वाचा…

Anti Diabetic Drinks To Control Blood Sugar Levels : आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. खराब जीवनशैलीमुळे हा आजार बहुतेक जणांना झाला आहे.अनेकदा लोक त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतात. पण औषधे घेण्यासोबतच मधुमेहामध्ये आहाराचीही विशेष काळजी घेणे देखील फार महत्वाचे आहे. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीने रक्तातील साखरेची पातळी कमी करता येते. मधुमेह हा आज एक सामान्य आजार झाला आहे पण त्यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास शरीर अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते.

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याने कॅलरीजवर देखील विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. अतिरिक्त वजनामुळे साखरेची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहविरोधी पेये सेवन करता येतात. या पेयांमुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी तर कमी होतेच पण वजनही नियंत्रणात राहते. आज आम्ही तुम्हाला अशाच पेयांबद्दल सांगणार आहोत.

कडुलिंबाचे पाणी

मधुमेही रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन करू शकतात. या पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. अशा स्थितीत याच्या सेवनाने मधुमेह तर आटोक्यात येईलच पण शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होईल. कडुलिंबाचे पाणी बनवण्यासाठी ५ ते ७ पाने खुडून धुवा. १ ग्लास पाणी गरम ठेवा. त्यात ही पाने घालून पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. आता हे पाणी गाळून प्या. हे पाणी पचनसंस्था देखील मजबूत करते.

तुळशीचे पाणी

तुळशीच्या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात. यामध्ये अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि शरीर निरोगी राहते. हे पाणी बनवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 7 ते 8 तुळशीची पाने उकळा. अर्धे पाणी उरले की ते गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा.

दालचिनीचे पाणी

दालचिनीचे पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे पाणी प्यायल्याने मधुमेह तर नियंत्रित राहतोच पण वजनही नियंत्रणात राहते. हे पाणी बनवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात दालचिनीच्या 1 ते 2 काड्या भिजवा. हे पाणी गाळून सकाळी प्या. शरीरातील सूज दूर करण्यासोबतच हे पाणी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील कमी करते.

आल्याचे पाणी

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आल्याच्या पाण्याचेही सेवन केले जाऊ शकते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. आल्याचे पाणी बनवण्यासाठी २ ते ३ इंच आल्याचा तुकडा किसून घ्या आणि १ ग्लास पाण्यात ५ मिनिटे उकळा. आता हे पाणी गाळून घ्या आणि त्याचे सेवन करा. हे पाणी गाळून प्यायल्याने वजन कमी होण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

मेथीचे पाणी

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीचे पाणी प्यायले जाऊ शकते. मेथीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे पाणी बनवण्यासाठी १ चमचा मेथी १ ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी गाळून सकाळी प्यावे. असे नियमित केल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि वजनही नियंत्रित राहते.

Renuka Pawar

Recent Posts