अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- बँकांच्या विविध सेवांमध्ये बँक लॉकर ही देखील एक महत्त्वाची सुविधा आहे. तुम्ही देखील बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
रिझर्व्ह बँकेनं लॉकर भाड्यानं घेण्यासंबंधित असलेल्या मार्दर्शक सूचनांमध्ये काही बदल केले आहे. जर तुम्ही लॉकरचा वापर करत असाल तर यात काय बदल होऊ शकतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मते, बँकांना त्यांच्या संचालक मंडळानं मंजूर केलेल्या अशा धोरणांची अंमलबजावणी करावी लागेल, ज्यात निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी त्यांची जबाबदारी निश्चित करता येईल.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती किंवा ‘अॅक्ट ऑफ गॉड’ अर्थात भूकंप, पूर, वीज किंवा वादळ झाल्यास कोणत्याही नुकसानीस बँक जबाबदार राहणार नाही. तथापि, बँकांना त्यांच्या परिसराला अशा आपत्तींपासून वाचवण्यासाठी योग्य व्यवस्था करणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेची सुधारित नियमावली