Best Budget Tablets : सध्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. परंतु, आता टॅब्लेट खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
या सर्व टॅब्लेटमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली आहेत.यामध्ये रियलमी, Lenovo आणि Oppo यांसारख्या दिग्ग्ज कंपनीचा समावेश आहे.
1. Realme Pad X
या नवीनतम टॅबलेटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. यामध्ये 1200×2000 पिक्सेल रिझोल्यूशनसह 11-इंचाचा WUXGA+ डिस्प्ले आहे. स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज टॅबलेटमध्ये दिले आहे.
यामध्ये 5 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम आहे, म्हणजे टॅबचे स्टोरेज आवश्यक असल्यास रॅम म्हणून वापरले जाऊ शकते. 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा वाइड-एंगल फ्रंट कॅमेरा आहे. Realme Pad X मध्ये Dolby Atmos सह चार स्पीकर आहेत. तसेच यामध्ये 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 8340mAh बॅटरी आहे. कमी लेटन्सी Realme Pencil देखील Realme Pad X सह समर्थित आहे.
2. Lenovo Tab M10
यामध्ये 10.61-इंचाचा फुल HD डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon SDM 6803 प्रोसेसर दिला आहे. Lenovo Tab M10 मध्ये कंपनीने 6 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB स्टोरेज दिले आहे.
जे टॅबलेटचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. यामध्ये 7700mAh बॅटरी कंपनीने दिली आहे. या टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज फ्लिपकार्टवर 19,999 रुपयांना सूचीबद्ध आहे.
3. Oppo Pad Air
Oppo Pad Air मध्ये 10.36-इंचाचा 2K डिस्प्ले कंपनीने दिला आहे, जो 2,000×1,200 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. Android 12 आधारित ColorOS 12 Oppo Pad Air टॅबलेटमध्ये उपलब्धअसून तो ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 6nm आणि 4 GB LPDDR4x RAM आहे, जी7 GB पर्यंत वाढवता येते.
या टॅबलेटमध्ये क्वाड स्पीकर्स उपलब्ध आहेत, जे डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात. टॅबलेटमध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा सेन्सर कंपनीने दिला आहे. याला 7,100mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते.
स्टोरेजचा विचार केला तर 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांच्या किमतीत आणि 4 GB रॅम सह 128 GB स्टोरेज आहे. जो 19,999 रुपये किमतीत खरेदी करता येईल.
4. Samsung Galaxy Tab A8
Galaxy Tab A8 या टॅबलेटची किंमत 13,999 रुपये आहे. या टॅबमध्ये 10.5-इंचाचा डिस्प्ले आणि Unisoc T618 प्रोसेसर आहे. तसेच यामध्ये चार स्पीकर आहेत, जे डॉल्बी अॅटमॉससह येतात.
यामध्ये मागील बाजूस 8 मेगापिक्सेल आणि समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या टॅबमध्ये 7040mAh बॅटरी दिली आहे. टॅबमध्ये 4 GB पर्यंत रॅम आणि 64 GB पर्यंत स्टोरेज मिळते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
5. Realme Pad
Realme पॅड हा कमी किमतीत तुम्ही विकत घेऊ शकता. Realme Pad ला 10.4-इंचाचा डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे, ज्याला 2,000×1,200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
तसेच याला 8MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो. त7100 mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. हा टॅबलेट 16,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.