ताज्या बातम्या

आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे, आम्हाला ठार केलं तरी तयार आहे; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

नुकतेच आज मीडियाशी संवाद साधताना आयएनएस विक्रांतच्या निधीच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर (Bjp) सडकून टीका केली. तसेच शरद पवार (Sharad Pawar) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या भेटीबद्दलही ते बोलले आहेत.

संजय राऊत म्हणाले, मी कालच शरद पवारांचे आभार मानले. माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकांचा विषय त्यांनी पंतप्रधानांकडे नेला. ज्या प्रकारच्या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. माझ्या निमित्ताने पवारांनी माझ्यावतीने खंत व्यक्त केली आहे.

आम्ही सर्व एकत्र आहोत. पवार काल माझ्यासाठी पंतप्रधानांना भेटले याचा अर्थ समजून घ्या. तिन्ही पक्ष सोबत तुम्ही त्याला संकट म्हणता ती आमच्यासाठी संधी आहे. आम्ही त्यांना परिस्थिती सांगितली आहे, असे ते म्हणाले आहेत.

त्याचसोबत हे समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही. ही शिवसेना आहे. ही लोचकांच्या मनातील चिड आणि संताप आहे. कालपासून विनायक राऊत माझ्यासोबत आहेत. अनेक विषयावर चर्चा करत आहोत. विक्रांत घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गावपातळीवर आंदोलन झालं. तिथेही गर्दी आहे. हा सुद्धा संताप चीड आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेवून शिवसेना किंवा इतर नेत्यांवर हल्ला केले जातात ही नामर्दानगी आहे. त्याविरोधातील हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरवात आहे. ही ठिणगी पडली आहे, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

याचसोबत केंद्रीय तपास यंत्रणांच्या (central investigation team) माध्यमातून हल्ले केले जात आहेत. ते काय करू शकतात? ते आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे.

आमच्यावर खुनी हल्ला करा, आमची तयारी आहे. आम्हाला ठार केलं तरी आमची तयारी आहे. या पुढे २५ वर्ष तुमची सत्ता येणार नाही याची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्हीच तुमचती कबर तुम्हीच खोदली आहे असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts