ताज्या बातम्या

दुष्काळात तेरावा महिना! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका; हजारोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी बांधव आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या दुहेरी संकटामुळे शेतकरी राजा (Farmer) पुरता भरडला गेला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आधीच लाखो रुपयांचा फटका बसलेला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा (Bogus Soybean Seed) फटका बसत आहे. यामुळे शेतकरी राजाचे कंबरडे मोडले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) चारशे हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला बोगस बियाण्याचा फटका बसला आहे.

बोगस बियाणांमुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean Growers) पेरणी केलेले सोयाबीन उगवलेच नाही.

काही शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले मात्र शेंगा लागल्या नाहीत तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या मात्र शेंगा आता गळू लागल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे. बोगस बियाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकरवरील सोयाबीन नांगरून टाकला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र आता उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल होण्याआधीच संकटात सापडला आहे.

यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एका प्रतिष्ठित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. शेतकऱ्यांना बियाणे विक्री करताना कंपनीने एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळेल असा दावा केला होता.

मात्र बांधावरची परिस्थिती बघता कंपनीचा दावा निरर्थक असल्याचे समजत आहे. या बोगस बियाण्यातून हेरवाड येथील एका शेतकऱ्याला तीन एकरात केवळ अकरा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले.

काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला तर शेंगा लागल्या आणि काढणीच्या वेळी सोयाबीनच्या शेंगा फुटून सोयाबीन जमिनीवर पडला आहे.

एकंदरीत या बोगस सोयाबीन बियाण्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला असून पदरी निराशा पडली आह.

याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले की याबाबत संबंधित शेतकऱ्यांकडून सदर कंपनीची माहिती घेतली जाणार आहे आणि चौकशी करून सदर कंपनीवर पुढील कारवाई केली जाईल.

एकंदरीत निसर्गाशी झुंज देत असलेला बळीराजा आता सुलतानी व अनैतिक व्यवहाराच्या बळी पडला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला एवढे नक्की.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office