TECNO SPARK GO : बजेट कमी आहे? आणि चांगले फिचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचाय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण TECNO ने आपला कमी किमतीत एक भन्नाट स्मार्टफोन लाँच केला आहे.
तुम्ही तो 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. 5000mAh बॅटरीसह हा फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला आला आहे. शिवाय कंपनीनेही यात उत्तम फीचर्स दिली आहेत. त्यामुळे कमी किमतीत जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन विकत घेण्याची संधी गमावू नका.
इतक्या किमतीत खरेदी करता येणार
TECNO च्या या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये इतकी असून जर तुम्हाला तो विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही सर्व रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. नेब्युला पर्पल, एंडलेस ब्लॅक आणि यूआनी ब्लू अशा तीन कलर व्हेरियंटमध्ये हा फोन सादर झाला आहे.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
जर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये कंपनीने 90% स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 6.56-इंचाचा डॉट नॉच HD+ डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. या स्मार्टफोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX2 रेटिंग मिळाली आहे. तसेच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये स्मार्ट फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात ३ जीबी रॅम असून ३२ जीबी स्टोरेज असून ते मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
मिळणार जबरदस्त कॅमेरा
यात ड्युअल रिंग कॅमेरा सेटअप असून ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) देखील 13MP कॅमेरासह समर्थित असणार आहे. मागील कॅमेर्याचे छिद्र ƒ/1.85 आहे आणि त्यास फ्लॅशलाइट आहे. या कॅमेऱ्यासोबत पोर्ट्रेट, एचडीआर, टाइम-लॅप्स आणि एआय सीन डिटेक्शन सारखी जबरदस्त फिचर कंपनीने दिली आहेत. परंतु अजूनही कंपनीने फ्रंट कॅमेराबद्दल कोणती माहिती दिलेली नाही.
अशी असेल बॅटरी
हा फोन टाईप-सी चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. वापरकर्त्यांसाठी या फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंग देखील आहे आणि चार्जर बॉक्समध्येच मिळेल. टाइप-सी पोर्टसह येणारा या सेगमेंटमधील हा पहिला फोन आहे.