ताज्या बातम्या

Tata Group : ‘या’ कंपनीने गुंतवणुकदारांना दिला 12 कोटी रुपयांचा परतावा, तुम्हीही केलीय का गुंतवणूक?

Tata Group : अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. यातील काही शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल होतात तर काही शेअर्समुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. टाटा समूहामध्ये अनेक गुंवणूकदार गुंतवणूक करतात.

अनेकदा ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा देते. अशातच पुन्हा एकदा टाटा समूहाने आपला गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. कंपनीने 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दीर्घ मुदतीत 12 कोटी रुपये केले आहेत. या जबरदस्त परताव्यामुळे गुंवणूकदार करोडपती झाले आहेत.

असा होता तिमाहीचा निकाल

दरम्यान, कंपनीचा तिसऱ्या तिमाहीत महसूल 817.70 कोटी रुपये इतका होता. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 635.40 कोटी रुपये होता. त्यानुसार, Tata Elxsi च्या महसुलात 28.70 टक्के इतकी वाढ झाली आहे. याशिवाय कंपनीचा EBITDA सुद्धा सुधारला आहे. डिसेंबर तिमाहीसाठी Tata Elxsi चा EBITDA 246.90 रुपये कोटी इतका होता. तसेच गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तो 210.80 कोटी रुपये इतका होता.

अशी आहे टाटा Elxsi स्टॉकची कामगिरी

शुक्रवारी बीएसईवर टाटा Elxsi चे शेअर्स 0.99 टक्क्यांनी वाढून 6662.10 रुपयांवर बंद झाले. या कंपनीचा शेअर 10 एप्रिल 1996 रोजी 10.63 रुपयांना उपलब्ध होता. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपयांची बोली लावली असती त्याला 9407 शेअर्सचे वाटप केली असते.

18 सप्टेंबर 2017 रोजी, कंपनीने तिच्या गुंतवणूकदारांच्या प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर दिला. स्थानबद्ध गुंतवणूकदारांच्या समभागांची संख्या 18,814 पर्यंत वाढली. या कंपनीचा आजचा दर बघितला तर 1 लाखाची गुंतवणूक वाढून 12.53 कोटी इतकी झाली आहे. गेल्या 26 वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 10,760.40 आणि 52 आठवड्यांचा नीचांक रु 5708.10 आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Tata Group

Recent Posts