ताज्या बातम्या

Ola Electric Scooter :  ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात घालत आहे धुमाकूळ, जाणून घ्या फीचर्स

Ola Electric Scooter  : ओलाने (Ola) अलीकडेच आपली  स्कूटर S1 प्रो साठी  (S1 Pro Booking) बुकिंग विंडो उघडली आहे. याशिवाय पाच शहरांमध्ये त्याची टेस्ट राइडही सुरू करण्यात आली आहे.

ज्यांनी ओलाची इलेक्ट्रिक (Electric Scooter) स्कूटर S1 प्रो  बुकिंग केली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . तुम्ही पण ही स्कूटर बुक केली असेल तर तुम्हाला त्याच्या डिलिव्हरीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही. 

इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी किती दिवसात होईल
वास्तविक, ओला इलेक्ट्रिक सध्या डिलिव्हरी मोहीम राबवत आहे. या अंतर्गत, S1 Pro स्कूटर खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत ग्राहकांना ते वितरित केले जाईल. कंपनीने अलीकडेच आपल्या संभाव्य ग्राहकांना याबाबत ईमेल पाठवला आहे.

या ईमेलमध्ये Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या 14 दिवसांच्या गॅरंटीड डिलिव्हरीबद्दल सांगण्यात आले आहे मात्र, कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.  ओलाने नुकतीच या स्कूटरसाठी बुकिंग विंडो उघडली आहे. याशिवाय पाच शहरांमध्ये त्याची टेस्ट राइडही सुरू करण्यात आली आहे. कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर फीचर्स 
S1 Pro प्रकारात नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. हा प्रकार पूर्ण चार्ज केल्यावर 181 किमी पर्यंत अंतर कापू शकतो. S1 Pro प्रकार 3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो! त्याच वेळी, या स्कूटरचा टॉप स्पीड 115 kmph आहे. या स्कूटरची बॅटरी क्षमता 3.97 kWh इतकी आहे.  Ola S1 Pro ची बॅटरी उच्च क्षमतेची युनिट असल्याने ती पूर्ण चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेते. 

पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात. S1 Pro ची बॅटरी अवघ्या 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते आणि 75 किमीची ड्रायव्हिंग रेंज देण्यासाठी ते पुरेसे आहे असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय S1 Pro स्कूटर 10 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts