ताज्या बातम्या

शिवसेनेचा हा फायरब्रँड नेताही फुटला, गुवाहाटीकडे रवाना

Maharashtra Politics : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

काल मुबंईत शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी अचानक सकाळी एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला.रात्रभर भाजपाचे नेते गिरीश महाजन गुलाबरावांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.

एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटलांशी संपर्क करुन त्यांना गळ घातली. रात्रभर झालेल्या या घडामोडीनंतर पाटील शिंदे गटात दाखल झाले आहेत. ते मुंबईहून गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts