weather forecast: यावर्षी जादा पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी पडणार, असा सर्वसामान्यांचा अंदाज असला तर हवामान विभागाने मात्र शास्त्रीय अधारावर वेगळीच शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात आकाश ढगाळ रहाणार आहे, अधूनमधून पावसाची शक्यता आहे, त्यामुळे अपेक्षित थंडी पडणार नाही.
मात्र, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात अधूनमधून चक्रीय स्थिती आणि कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत.
परिणामी महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पाऊस पडेल. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये किमान तापमानात फारशी घट होणार नाही. देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे थंडीचा कडाका कमी राहील. मात्र, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. या कालावधीत अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे.