ताज्या बातम्या

Makar Sankranti 2023 : यंदाच्या मकर संक्रांतीचा हा आहे शुभ मुहूर्त, सूर्याचा होणार मकर राशीत प्रवेश…

Makar Sankranti 2023 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्व आहे. या दिवशी महिलांना विशेष महत्व असते. यंदाची मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. सूर्याला १२ राशींमधून प्रवेश करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.

मकर संक्रांतीदिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने थंडीही हळूहळू कमी होईल लागते. महिलांना मकर संक्रांत साजरी करण्यासाठी काही शुभ मुहूर्त देखील आहेत.

शुभ मुहूर्तावर महिला एकमेकांना भेटण्याचा आणि तिळगुळ देण्याचा कार्यक्रम करू शकतात. तसेच सूर्यदेवाची देखील पूजा करू शकतात. सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा वेळ ठरलेला आहे.

कोणत्या दिवशी मकर संक्रात साजरी होणार

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.44 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. भारतीय परंपरेनुसार पहाटे सूर्योदयाला येणारा सण मानला जातो. त्यामुळे 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२३ रोजीच या उत्सवाशी संबंधित सर्व परंपरांचे पालन केले जाईल.

मकर संक्रात साजरी करण्याचा शुभमुहूर्त

सूर्याचा मकर राशीत प्रवेश – 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.43 वाजता
मकर संक्रांतीची शुभ वेळ – 15 जानेवारी रोजी सकाळी 6.47 ते सायंकाळी 5.40

अशी करा सूर्य देवाची पूजा

या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावरच सूर्याची आराधना करून जलाने अर्घ्य द्यावे. यानंतर सूर्यदेवाला गूळ, तीळ आणि खिचडी अर्पण करा. त्यांची आरती करून प्रसाद वाटप करावा. आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल तर या दिवशी सूर्यदेवतेसाठी यज्ञ व इतर विधीही करता येतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts