पोपटराव पवार यांच्यावर आता ही जबाबदारी!

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- केंद्रीय वने व पर्यावरण समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.

समितीमार्फत पडजमीनी वनाचछादित करणे, जंगलतोड थांबविणे, पर्यांवरण संतुलनाच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात हरितपट्टे निर्माण करणे या कामांवर चालते नियंत्रण.

पद्मश्री सन्मान मिळालेले पोपटराव पवार गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामविकासाच्या कार्यात सहभागी असून देश विदेशात ते ग्राम विकासाचे पथदर्शी मार्गदर्शन करत असतात.

त्यांनी हिवरेबाजार या त्यांच्या गावात लोकसहभागातून केलेल्या जलसंधारण, वृक्षारोपण यासहअनेक कामामुळे आज देशात हे गाव ग्राम विकासाचे आदर्श म्हणून पाहिले जाते.

त्यामुळे देशभरातील राजकीय नेते, प्रमुख अधिकारी यांच्यासह बाहेरच्या देशातील देखील अनेक जण या गावास भेट देतात.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts