ताज्या बातम्या

WhatsApp feature : व्हॉट्सॲपचे ‘हे’ नवीन फीचर घालणार धुमाकूळ, चुटकीसरशी शोधाता येणार मेसेज

WhatsApp feature : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपचे नवीन फीचर आले होते, अशातच पुन्हा एकदा व्हॉट्सॲपचे नवीन फिचर येत आहे. त्यामुळे आता चॅटिंग करणे आणखी मजेशीर होणार आहे.

या नवीन फीचरमुळे यूजर्सना तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहे. त्यामुळे युजर्सना आता सगळी चॅट पाहण्याची करण्याची गरज पडणार नाही. सविस्तर जाणून घेऊयात या फीचर्सबद्दल.

तारखेनुसार मेसेज शोधणे सोपे

हे लक्षात घ्या की हे फीचर केवळ iOS बीटा यूजर्सना वापरता येईल. नवीन फीचरमुळे चॅटमधील मेसेज शोधणे सोपे झाले असून त्याशिवाय तारखेनुसार जुने मेसेज पाहता येणार आहे. त्यामुळे युजर्सना आता पूर्ण चॅट सर्च करण्याची गरज नाही. युजर्स आता थेट तारीख टाकून मेसेज शोधू शकतील.

असा करा वापर

यूजर्सना सर्च सेक्शनमध्ये नवीन कॅलेंडर आयकॉन मिळेल, यावर टॅप केल्यानंतर यूजर्सना तारखेनुसार मेसेज पाहता येईल. लाँग चॅट हिस्ट्रीमुळे वैतागलेल्या यूजर्ससाठी हे फिचर फायद्याचे आहे. त्याशिवाय ग्रुप चॅट हिस्ट्रीही पाहता येईल.

स्वतःला मेसेज करता येईल

मेसेज युवरसेल्फ हे फीचर मल्टी डिव्हाईस सपोर्ट म्हणून सादर करण्यात आले असून तुम्ही टू-डू लिस्ट, शॉपिंग लिस्ट, नोट्स इत्यादी ठेवू शकता. महत्त्वाच्या नोट्सआणि अपडेट्स लक्षात ठेवण्यासाठी या फीचरचा वापर होईल.

परंतु हे लक्षात घ्या की व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी नसणार आहे. काळजी करण्याचे कारण नाही कारण लवकरच हे फिचर सर्वांना वापरता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts