‘ही’ संस्था शेतकऱ्यांची कामधेनू : माजी मंत्री कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सहकारी संस्थांच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. प्रशासकीय कामकाज करीत असतांना संस्थेच्या प्रगतीकडे कर्मचारी लक्ष देत असतात.

खा. दादापाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आम्ही नेहमीच सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या बाजार समितीचा राज्यामध्ये नावलौकिक आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर राहून प्रश्­न सोडवले आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी नेप्ती उपबाजार समिती निर्माण केली. व आज राज्यात सर्वात जास्त कांदा आपल्या समितीमध्ये शेतकरी घेऊन येत असतात.

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचे काम खा. दादापाटील कृषीउत्पन्न बाजार समितीने केले आहे. असे प्रतिपादन मांजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

माजी मंत्री कर्डिले यांची जिल्हा सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल खा. दादापाटील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाराच्या वतीने सत्कार केला.

माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या कामधेनू आहे. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बाजार समिती नेहमीच प्रयत्नशील असते.

कर्मचाऱ्यांनी या पुढील काळात अधिक जोमाने काम करून बाजार समितीच्या विकासाला चालना द्यावी असे ते म्हणाले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts