ताज्या बातम्या

उध्दव ठाकरेंच्या ‘मशाल’वर आता या पक्षाचा दावा

Maharashtra News:शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले खरे पण त्यांच्यासमोरील अडचणी संपायला तयार नाहीत. आता या चिन्हावर समता पक्षाच्या नेत्यांनी दावा केला आहे.

यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाण्याची तयारीही सुरू केली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या समता पक्षाने मशाल हे आपले निवडणूक चिन्ह असल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतही समता पक्ष उतरणार असल्याची चर्चा आहे. १९९६ पासून मशाल हे आमचे पक्ष चिन्ह आहे, असे सांगत समता पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

खरंतर मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोपवताना ते समता पक्षाचे चिन्ह असल्याचे कारण निवडणूक आयोगाने नमूद केले होते. २००४ मध्येच त्यांची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे हे चिन्ही खुले झाले असून ते ठाकरे यांच्या गटाला देण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts