WhatsApp feature : जगभरात व्हॉट्सॲपचे वापरकर्ते खूप आहेत. व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया आहे. त्याशिवाय नवनवीन फीचर्समुळे व्हॉट्सॲप चर्चेत असते.
नुकतेच व्हॉट्सॲपने काही भन्नाट फिचर आणले होते. अशातच आता पुन्हा एकदा व्हॉट्सॲपने जबरदस्त फीचर आणले आहे. या फीचरमुळे मेसेज गायब होणार आहेत.
अहवालानुसार, काही परीक्षकांनी Android साठी व्हॉट्सॲप बीटाची अपडेटेड आवृत्ती (आवृत्ती2.22.25.11) डाउनलोड केल्यानंतर या नवीन फीचरचा वापर केला.
या फीचरमध्ये मॅनेज स्टोरेज सेक्शन ऍक्सेस केला जाऊ शकतो आणि ते स्पेस सेव्हिंग टूल असल्याचा दावा केला जात आहे. या नवीन सेक्शनचा वापर केल्याने नवीन आणि जुन्या दोन्ही चॅट्सना ‘डिसअपीयरिंग थ्रेड्स’ म्हणून चिन्हांकित करणे सोपे जाईल.
त्याशिवाय, वापरकर्त्यांना अप्रासंगिक मीडिया स्वयंचलितपणे हटविण्यासाठी टायमरसह अदृश्य मेसेज सेट करता येईल. वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये किंवा चॅट माहिती उघडून हे फीचर कॉन्फिगर करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
दोन डिव्हाइसमध्ये एक अकाउंट चालवता येईल
काही वापरकर्त्यांना एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर अकाउंट वापरण्याची परवानगी व्हॉट्सॲप देत आहे. अहवालानुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म बीटा परीक्षकांना त्यांचे व्हॉट्सॲप खाते इतर डिव्हाइसेस म्हणजेच टॅब्लेटशी लिंक करण्याची परवानगी देत असून व्हॉट्सॲप बीटा चॅनलवरील वापरकर्त्यांना त्यांचे खाते व्हॉट्सॲपच्या टॅबलेट आवृत्तीशी लिंक करण्यासाठी अलर्ट केला जात आहे.
त्याशिवाय बीटा प्रोग्राममध्ये नावनोंदणी केलेल्या अँड्रॉइड वापरकर्त्यांना एक बॅनर दिसत असून त्यावर “अँड्रॉइड टॅबलेट आहे का? टॅब्लेटसाठी WhatsApp बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे.” असेही पाहायला मिळत आहे.