India News:उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात होण्यापूर्वी तिचा वेग किती होता, ब्रेक दाबण्यात आले आणि अपघात झाला त्यावेळी कारचा वेग किती होता, अशा महत्त्वाच्या गोष्टी मर्सिडीज कंपनीने दिलेल्या प्राथमिक अहवालातून पुढे आल्या आहेत.
या घटनेचा तपास करणाऱ्या पालघर पोलिसांना कंपनीने हा अहवाल दिला असून अधिक तपासणी सुरू आहे. अपघातग्रस्त कारमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे कंपनीने हा अहवाल तयार केला आहे.
अपघातापूर्वी कार १०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत होती. अपघाताच्या ५ सेकंदांपूर्वी अनाहिता पंडोळे यांनी ब्रेक दाबले.
त्यामुळे कारचा वेग ८९ किमी प्रतितासवरून ११ किमी प्रतितासवर आला. याच वेगात असताना कारला अपघात झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
यावर पोलिसांनी कंपनीकडे आणखी काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी कंपनीचे पथक हाँगकाँगहून भारतात यायला निघाले आहे.