अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहरासाठी बाळासाहेब थोरात यांचे कर्तृत्व काय आहे हे त्यांनी सांगावे. त्यांच्या 35 -40 वर्षाच्या कार्य काळामध्ये त्यांनी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहमदनगर शहरासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी द्यावा , त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा नगर शहरासाठी काहीही केलेले नाही.
याचा अर्थ असा आहे “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकुन” अशी परिस्थिती किरण काळेंची आहे. तुमच्या नेत्यांना आमदार जगताप यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीमध्ये सांगितले होते नगर जिल्ह्याची कोरोना ची परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे,
या शहरामध्ये जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमधून रुग्ण येतात मात्र रेमडीसिविरचा व ऑक्सीजन अपुरा साठा ही चिंतेची बाब आहे ही प्रश्न दूर करण्यासाठी उपयोजना करण्यासाठी मंत्री म्हणून तुम्ही आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या असं आमदार जगताप यांनी थोरातसाहेबांना सांगितलं परंतु त्यावेळेस तुमच्या नेत्यांनी फक्त हो म्हंटलं पण प्रत्यक्ष कृती मात्र शून्य केली .
ही बाब तुमच्यासारख्या बालबुद्धी पर्यंत पोहोचलेली दिसत नाही. आ.जगतापांच्या टर्म मोजण्यापेक्षा तुमच्या नेत्याच्या टर्म मोजा काही काळ पालकमंत्री राहिलेल्या नेत्यानी शहरासाठी काय काम केलं याचा जाब किरण काळे तुम्ही आम्हाला नाही तर त्यांना विचारला पाहिजे, परंतु तुमच्यात ही हिंमत नाही.
जिल्ह्यातील नेतेगण ज्याच्या त्याच्या कामात मशगुल आहेत. मात्र आमदार संग्राम जगताप शहरातील हॉस्पिटलांना प्रत्यक्ष भेट देत आहेत, त्यांच्या समस्या सोडवत आहेत . सिव्हील सर्जन व जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेऊन औषधाचा व ऑक्सीजन चा प्रश्न मार्गी लावत आहे. खाजगी हॉस्पिटल ला देखील ऑक्सीजन पुरवण्यासाठी आमदारांची धडपड चालू आहे .
मात्र तुमच्या या बंद डोळ्यांना हे दिसत नाही कारण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची दानत तुमच्या नाही. आमदार जगताप यांची कारकीर्द बघण्यासाठी शहरात फेरफटका मारला की विकास दिसेल पण तोही तुमच्या आंधळ्या डोळ्यांना दिसतो की नाही ही शंकाच आहे.
आमच्या कारकीर्दीचा मोजमाप करण्यापेक्षा तुमच्या नेत्याची कारकीर्द मोजा नगरकर या नात्याने त्यांनी शहरासाठी काय केले ? याचा हिशोब तुम्ही मागा आणि तो जनतेसमोर मांडा त्यांनी मंत्री असून
नगर शहारासाठी केलेलं काम आणि आमच्या आमदारांनी केलेलं काम याची जंत्री घेऊन आपण समोरासमोर सोक्षमोक्ष करू तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमच्या नेत्याला याचा जाब विचारा अन्यथा आमच्या दृष्टीने तुम्ही केवळ बोलघेवडे पोपट आहात असे आम्ही मानतो.
तुमचे दुसरे नेते युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निवडणुकी पुरता शहराचा वापर करून आज नगरकरांना वाऱ्यावर सोडून कुठे गायब झालेले आहेत. याचा शोध किरण काळे आणि गुंदेचा यांनी घ्यावा.
त्यांच्या वडिलांच्या देखील जिल्ह्यात विधानपरिषद दोन टर्म झालेल्या आहेत त्यांनीदेखील नगर शहरासाठी काय केल आहे हे सांगावे का फक्त निवडणुकी पुरतेच नगर शहर आहे का हे त्यांना किरण काळे तुम्ही विचारा .
किरण काळे तुमची देखील खंडणी सारख्या गुन्ह्याच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधून हकालपट्टी झालेली आहे, ” जिकडे भक्ष तो तिकडे पक्ष नाहीतर अपक्ष ” अशा प्रवृत्तीच्या किरण काळे यांनी अकलेचे तारे तोडू नये असा किरण काळे यांना राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी सल्ला दिला