ताज्या बातम्या

ह्या जिल्ह्यात बर्ड फ्लूने तीनशे कोंबड्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरात ३०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीत एक पोल्ट्री फार्म आहे.

तेथील कोंबड्या काही दिवसांपासून तडफडून मरत असल्याचे पोल्ट्री फार्म मालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली.

त्यांनी तत्काळ कोबड्यांची तपासणी केली. तपासणीत कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर जवळच्या परिसरात बाधित झालेल्या कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे.

कारण अनेक कोंबड्यांना बर्ड फ्लूची बाधा झाली आहे. सध्या पशुसंवर्धन विभागातील ७० कर्मचारी या कामी कार्यरत आहेत.

संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली (ता. शहापूर) येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील १ किमी त्रिजेतील क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. – राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts