ताज्या बातम्या

नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, ११ जणांचा होरपळून मृत्यू

Maharashtra News:नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे आज पहाटे अपघातानंतर एका बसला आग लागली. त्यावेळी साखर झोपेत असलेल्या ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर २९ प्रवासी जखमी झाले आहेत.

नाशिकच्या औरंगाबादरोडवरील मिरची हॉटेल जवळ पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे निघाली होती.

नाशिकमध्ये एका आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि काही काळात ती भडकली. बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च देखील राज्य सरकारकडून केला जाईल असे त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office