अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सिडनी ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण वणवा पेटलेला आहे. आजवर १०० कोटी प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. २५०० घरे उद्ध्वस्त झाली, तर आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अग्निशमन जवानांसह २९ लोकांना प्राण गमावावे लागले आहेत.
या आपत्तीमुळे न्यू साऊथ वेल्समध्ये नवा नियम लागू करण्यात आला आहे. धावत्या वाहनांतून काेणी पेटती सिगारेट फेकल्यास त्याला ११ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे ५.३५ लाख रुपये) दंड ठोठावण्यात येणार आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले, २०१९ मध्ये २०० लोकांना पकडण्यात आले. त्यांना ६६० डॉलर (सुमारे ३२ हजार रुपये) दंड आकारण्यात आला होता. तरीही लोकांनी मनमानी सुरू ठेवल्याने दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
Web Title – Throwing a cigarette will result in a fine of Rs 5 lakh!