Petrol Diesel Price : मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. परिणामी त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेटही कोलमडत आहेत. फक्त पेट्रोल आणि डिझेल नाही तर इतर दैनंदिन वस्तूही महाग होत आहेत.
अशातच आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थे ठेवल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जाणून घ्या देशातील महानगरांधील पेट्रोल डिझेलच्या किमती
सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर मिळत आहे.
येथे मिळतेय सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल
राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळत आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर तर डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.
येथे मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
जाणून घ्या आजचे नवीनतम दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
आंतरराष्ट्रीय बाजारात अशी आहे कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूड 75.65 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.21 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $140 वर पोहोचल्या आहेत. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही घट झाली नाही.
केली उत्पादन शुल्कात कपात
याअगोदर 21 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर दिसून आला. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेकडूनही व्हॅटमध्ये कपात केली होती.