Gold Price Update : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी करण्यात येत आहे. जर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा कमालीची घसरण झाली आहे.
मागच्या आठवड्यात सराफा बाजारात सोने 218 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 169 रुपयांनी स्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने किंवा चांदीची खरेदी केली तर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान आज व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस आहे.
खरं तर मागील अनेक आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. परंतु, गेल्या तीन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोने 218 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 169 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आज जाहीर होत आहेत नवीनतम किमती
आजपासून नवीन व्यावसायिक आठवड्याला सुरुवात होत आहे. शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात फक्त सोने नाही तर चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यामुळे आज सर्वांचे सोने आणि चांदीच्या वाटचालीकडे लक्ष असणार आहे.
असे होते शुक्रवारी दर
शेवटच्या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, सोने एकूण प्रति 10 ग्रॅम 123 रुपयांनी स्वस्त होऊन 55957 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 416 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 56080 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले आहेत.
इतकेच नाही तर शुक्रवारी चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शुक्रवारी चांदीचे दर 851 रुपयांनी घसरून 64331 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचे दर 804 रुपयांच्या घसरणीसह 65182 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाले.
जाणून घ्या नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या किमती
24 कॅरेट सोने 123 रुपयांनी स्वस्त होऊन 55957 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 122 रुपयांनी स्वस्त होऊन 55733 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 112 रुपयांनी स्वस्त होऊन 51257 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 92 रुपयांनी स्वस्त होऊन 41968 रुपयांवर आले. 14 कॅरेट सोने 72 रुपयांनी स्वस्त होऊन 32735 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार होत आहे.
सोने आणि चांदीही झाली स्वस्त
सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 2925 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. याअगोदर म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचे दर 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेले होते. तसेच चांदी अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 15649 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.
सर्वात शुद्ध सोने
24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते, मात्र हे लक्षात घ्या की या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असते. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. तर 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवण्यात येतात, तर 24 कॅरेट सोने चमकदार असते, मात्र त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.