ताज्या बातम्या

ITR Filing Deadline: आयटीआर दाखल करण्याची आज आहे अंतिम तारीख, हे काम करा त्वरित पूर्ण! अन्यथा भरावा लागेल दंड…..

ITR Filing Deadline: इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै रोजी संपणार आहे. जर तुम्ही कराच्या जाळ्यात येत असाल आणि अजून ITR भरला नसेल, तर हे काम त्वरित पूर्ण करा. जर तुम्ही देय तारखेनंतर ITR भरला तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

त्यामुळे आयकर विभाग सातत्याने करदात्यांना वेळेवर आयटीआर दाखल करण्यास सांगत आहे. लोकांची अपेक्षा आहे की, सरकार (government) दरवेळेप्रमाणे या वर्षीही अंतिम मुदत (ITR फाइलिंग डेडलाइन एक्स्टेंशन) वाढवेल. याबाबत आयकर विभागाने बरीच माहिती दिली आहे.

31 जुलैपर्यंत सुमारे सात कोटी आयटीआर दाखल करायचे होते, मात्र 28 जुलैपर्यंत हा आकडा पाच कोटीपर्यंत पोहोचला नव्हता. अशा स्थितीत गेल्या दोन दिवसांत रिटर्न फाइलिंग पोर्टलवरील (Return Filing Portal) भार वाढू शकतो आणि यंत्रणा संथ होऊ शकते.

वेळेवर आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुमचा रिफंड झाला असेल, तर तुम्ही जितक्या लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाइल कराल तितक्या लवकर रिफंड येईल.

तारीख पुढे सरकणार नाही –

28 जुलै 2022 पर्यंत 4.09 कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर दाखल केल्याचे इन्कम टॅक्स इंडियाच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले आहे. 28 जुलै रोजी 36 लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते.

मूल्यांकन वर्ष 2022-23 (assessment year 2022-23) साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर ते त्वरित करा आणि विलंब शुल्क टाळा.

दंड किती असेल –

इन्कम टॅक्स इंडियाने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की, 31 जुलैपर्यंत आयटीआर फाइल करा आणि उशीरा दंड टाळा. म्हणजेच 1 ऑगस्टपासून आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. तुमचा रिटर्न वेळेवर भरून तुम्ही हे टाळू शकता.

अंतिम मुदतीनंतर ITR दाखल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

तुमचे स्वतःचे आयकर रिटर्न फाइल करा –

आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड (pan card), आधार कार्ड (aadhar card), बँक खाते क्रमांक, गुंतवणूक तपशील आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26AS आवश्यक असेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts