आज आहे दहावीचा निकाल जाणुन घ्या कसा पहाल..

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुलींचा समावेश आहे.

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक,

अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मंडळाने परीक्षेचे निकाल तयार केले आहेत. mahresult.nic.in sscresult.mkcl.org maharashtraeducation.com

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.

– त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा. – त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल. – तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts