4K Smart TV : Amazon India वर बंपर ऑफर मिळत आहे. डील ऑफ द डे योजनेअंतर्गत, ऑफरमध्ये 55-इंचाचा मिनी एलईडी स्मार्ट टीव्ही (55-inch Mini LED Smart TV) अर्ध्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
ही ऑफर TCL च्या 55-इंचाच्या मिनी एलईडी टीव्हीवर (TCL’s 55-inch Mini LED TV) दिली जात आहे. Amazon India
वर या टीव्हीची MRP 2,49,990 रुपये आहे.आज तुम्ही हा टीव्ही 1,30,000 रुपयांच्या सवलतीनंतर 1,19,990 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही हा टीव्ही एक्सचेंज ऑफरमध्ये घेतल्यास तुम्हाला 3,260 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
TCL च्या या 55-इंच टीव्हीमध्ये, तुम्हाला 2160×3840 पिक्सेल रिझोल्यूशनसह 55-इंचाचा 4K मिनी एलईडी डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश दर आणि 1000 निट्स ब्राइटनेस सह येतो.
कंपनी त्यात HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनलाही सपोर्ट करत आहे. टीव्हीमध्ये 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 64-बिट क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा टीव्ही गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
मजबूत आवाजासाठी यामध्ये 60 वॅटचा ONKYO स्पीकर सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 20 W चे सब-वूफर देखील मिळेल. घरामध्ये सिनेमा हॉलची अनुभूती देण्यासाठी टीव्ही डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस एचडीसह देखील येतो.
कनेक्टिव्हिटीसाठी यात चार HDMI पोर्ट आहेत. याशिवाय दोन यूएसबी पोर्ट्स, इथरनेट स्लॉट आणि एक ऑडिओ आउटपुटही यामध्ये देण्यात येत आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी वाय-फाय, आयआर आणि ब्लूटूथ देखील देत आहे.
टीसीएलचा हा टीव्ही हँड्स फ्री व्हॉईस कंट्रोल फीचरसह येतो. यासोबतच यामध्ये BMP, PNG आणि JPEG इमेजेसचाही सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये IMAX एन्हांस्ड सपोर्ट देखील प्रदान करण्यात आला आहे. हे नियमित स्वरूपापेक्षा मोठ्या गुणोत्तरांमध्ये सुसंगत मीडिया प्ले करते.