Top 5 Car Selling : सध्या देशात इंधनाचे दर (Oil Rate) वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या (Electric and CNG Car) खरेदीवर भर देत आहेत.
तरीही काही ग्राहक अजूनही इंधनावर चालणाऱ्या वाहनांची खरेदी करत आहेत. नुकतीच सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 5 कार्सची यादी प्रसिद्ध झाली आहे.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडिया लिमिटेडची एकूण विक्री जुलै 2022 मध्ये 8.28 टक्क्यांनी वाढून 1,75,916 युनिट्स झाली आहे.
मारुतीने सोमवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत ही माहिती दिली. यापूर्वी, मागील वर्षाच्या याच महिन्यात कंपनीने एकूण 1,62,462 वाहनांची विक्री केली होती.
ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सची (Tata Motors) एकूण विक्री जुलै 2022 मध्ये वार्षिक 51.12 टक्क्यांनी वाढून 81,790 युनिट्स झाली.
कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी वाहनांच्या मागणीमुळे विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात तिची एकूण देशांतर्गत विक्री 52 टक्क्यांनी वाढून 78,978 युनिट झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
जपानी कार निर्माता कंपनी टोयोटानेही (Toyota) कार विक्रीत वाढ नोंदवली आहे. जुलैमध्ये टोयोटाने 19,693 कार विकल्या. टोयोटाची ही आतापर्यंतची सर्वाधिक कार विक्री आहे. टोयोटाची ही विक्री जुलै 2021 मध्ये झालेल्या 13,105 युनिट्सच्या तुलनेत 50 टक्क्यांनी जास्त होती.
जुलै 2022 मध्ये Hyundai India ची एकूण विक्री सहा टक्क्यांनी वाढून 63,851 युनिट झाली आहे. माहिती देताना, Hyundai ने सांगितले की त्यांनी जुलै 2021 मध्ये 60,249 युनिट्सची विक्री केली. या वर्षी जुलैमध्ये कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री 5.1 टक्क्यांनी वाढून 50,500 युनिट्सवर गेली आहे.
वाहन कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने म्हटले आहे की जुलैमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण विक्री वार्षिक 33 टक्क्यांनी वाढून 28,053 युनिट्स झाली आहे. स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या संप्रेषणात, M&M ने सांगितले की, कंपनीने एका वर्षापूर्वी याच महिन्यात 21,046 युनिट्सची विक्री केली होती.