TOP-5 Electric Cars : देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आता लोक इलेक्ट्रिक कारकडे (Electric Car) वळू लागले आहेत.
मागील काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी (Electric Car Demand) वाढली आहे. बाजारात अनेक कार्स असल्यामुळे कोणती कार खरेदी करावी असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो.
टाटा टिगोर इलेक्ट्रिक कार
12.49 लाख ते 13.64 लाख रुपयांपर्यंतच्या या कारमध्ये (Tata Tigor Electric Car) अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. हे वाहन एका चार्जवर 306 किमीपर्यंत सहज चालवता येते. तुम्ही ते फक्त एका तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकता.
ह्युंदाई कंपनीची कोना इलेक्ट्रिक कार
ह्युंदाई (Hyundai) कंपनीचे नाव भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये येते. ही कंपनी उत्तम दर्जासोबतच उत्तम सेवेसाठी ओळखली जाते. तो EV क्षेत्रातही उतरला आहे. कंपनीच्या कोना इलेक्ट्रिक कारची (Kona electric car) शोरूम किंमत 23.84 ते 24.02 लाख रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 452 किमीपर्यंत प्रवास करते.
मिनी कूपर एसई कार
या कंपनीचे नाव भारतीय बाजारपेठेत मारुती, टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांइतके प्रसिद्ध नाही. परंतु त्यांनी लॉन्च केलेली इलेक्ट्रिक वाहने बाजारात इतर कंपन्यांना टक्कर देत आहेत.
दराचा विचार केला तर त्याची किंमत 47 लाखांच्या जवळपास आहे. जे एका पूर्ण चार्जवर 270 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
KIA EV6 कार
KIA कार चांगल्या मायलेजसाठी ओळखल्या जातात. या कंपनीने EV6 कार लॉन्च केली आहे ज्याची किंमत 59.50 लाख रुपये आहे. जे एका चार्जवर 528 किमी पर्यंत मायलेज देते.
BMW ची I4 कार
लक्झरी गाड्यांचा विचार केला तर. BMW हे नाव आधी घेतले जाते. उत्तम वैशिष्ट्यांसह आलिशान डिझाइन केलेल्या i4 कारची शोरूम किंमत 69.90 लाख ते 64.59 लाख रुपये आहे.
ही कार एका चार्जवर 590 किमी पर्यंत जाऊ शकते. ही कार 5.7 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते. ते ताशी 190 किलोमीटर वेगाने धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.