भारतातमधील फोरव्हीलर सेगमेंटमध्ये प्रचंड तेजी आल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांमधील या क्षेत्रातील वाहनांच्या विक्रीचा आकडा पाहिला तर सध्या नागरिकांमध्ये एसयूव्हीची मागणी किती वाढली आहे हे लक्षात येईल.
सध्याच्या मार्केटनुसार मिड सेगमेंट एसयूव्ही आणि सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीना जास्त डिमांड आहे. याच पार्श्वभूमीवर आता टोयोटा आपली नवीन कार Taisor भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
ही 5 सीटर कार असून 12 लाख ते 16 लाख रुपयांच्या दरम्यान याची किंमत असेल असं अंदाज वर्तण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कारला जबरदस्त असे 20 kmpl पर्यंत मायलेज देखील असे असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.चला याबद्दल जाणून घेऊयात.
कधी होईल लॉन्च
सध्या टोयोटा प्रेमी नवीन चारच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडेच कंपनीने दक्षिण आफ्रिकेत आपले अर्बन क्रूझर हायराईडर लॉन्च केले आहे. त्यामुळे आता भारतात नवीन कार लवकरच लॉन्च होईल अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत.
सध्या कंपनीने लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु आगामी वर्षात 2024 मध्ये ही कार भारतात लॉन्च होईल असे सांगण्यात येत आहे. या कारमध्ये आरामदायी सीट साइज आणि लग्जरी फीचर्स असतील. ही नवीन कार मारुती फ्रंटेक्सवर आधारित असेल असे सांगण्यात येत आहे.
याआधीही टोयोटा आणि मारुतीने एकमेकांच्या सहकार्याने वाहने बाजारात आणली आहेत. त्यामुळे आता ही नवीन कार मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे.
Taisor मध्ये अनेक विविध फीचर्स असतील. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पोषणसह ही कार येऊ शकते असं अंदाज आहे. कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आदी फीचर्स असतील.
ही कार मल्टी-स्पोक डिझाइन अलॉय व्हील्स, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस कनेक्टिव्हिटी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आदी फीचर्ससह येईल. कारमध्ये असणारे टर्बो इंजिन 110ps पॉवर आणि 148 nm चा पीक टॉर्क जनरेट करेल असे सांगितले जात आहे. ही कार मोठं मार्केट कॅप्चर करेल असा विश्वास कंपनीला आहे.