अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सहकार विभागातील 9 सहाय्यक निबंधक (एआर) यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात श्रीरामपूर, राहाता, पारनेर, नगर याठिकाणी नवीन सहाय्यक निबंधक, तर काही ठिकाणी जिल्हातंर्गत आणि काही ठिकाणी रिक्त असणार्या जागांवर सहाय्यक निबंधक यांच्या बदल्या आहेत.
याबाबतचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक यांनी काढले आहेत. शेवगावचे सहाय्यक निबंधक अनिल भांगरे यांची पुणे मुख्यालयात त्याच पदावर, सिन्नरहून संदीपकुमार रुद्राक्ष हे श्रीरामपर सहाय्यक निबंधक पदावर, पारनेरचे सुखदेव सुर्यवंशी यांची कर्जत सहाय्यक निबंधक रिक्त पदावर,
श्रीरामपूरचे सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांची शेवगावला त्याच पदावर, नांदेडवरून गणेश औटी यांची पारनेर सहाय्यक निबंधक पदावर, श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांची राहात्याला त्याच पदावर,
पुणे मुख्यालयातून रफिक शेख यांची नगर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील रिक्त पदावर, बीडहून अमाले माने यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक या रिक्त पदावर, राहाता येथील जितेंद्र शेवाळे यांची पुणे मुख्यालयात त्याच पदावर बदली झालेली आहे.