ट्रम्प 2023 पर्यंत आपल्या फेसबुक अकाउंटवर प्रवेश करू शकणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- फेसबुकनं अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट दोन वर्षांसाठी सस्पेंड केलं आहे. फेसबुकने शुक्रवारी ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट 2 वर्षांसाठी निलंबित केले.

यासोबतच भविष्यात नियम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार केला जाईल, याचीही घोषणा केली आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. त्याच दिवशी ट्रम्प यांचे खाते प्रथम निलंबित करण्यात आले होते.

फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. फेसबुकच्या म्हणण्यानुसार ट्रम्प 7 जानेवारी 2023 पर्यंत आपल्या फेसबुक अकाउंटवर प्रवेश करू शकणार नाहीत. म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये होणार्‍या मध्यावधी निवडणुकांमध्येही त्यांना फेसबुकपासून दूर राहावे लागेल.

ट्रम्प यांनी 2020च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या 75 दशलक्ष लोकांचा फेसबुकने अपमान केल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, त्या लोकांना सेन्सॉर करून, गप्प करून बाहेर केले जाऊ शकत नाही. आमही पुन्हा जिंकू. आपला देश हा अपमान यापुढे सहन करू शकत नाही.

तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जनतेला कोणताही धोका होऊ नये म्हणून ट्रम्प यांचे खाते कधी सक्रिय करायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे फेसबुकने म्हटले आहे. यासाठी हिंसाचार आणि शांततेचा भंग करणाऱ्या घटनांचा विचार केला जाईल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts