ताज्या बातम्या

Cough Desi Remedies : कोरडा खोकला दूर करण्यासाठी आजच ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय, लगेच पडेल आराम

Cough Desi Remedies : सध्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना छोट्या-मोठ्या आजारांची लागण होत आहे. त्यात सर्दी, खोकला आणि ताप यांच्या तक्रारी जास्त उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास वाढत जातो. अशातच कोरडा खोकला खूप त्रासदायक असतो.

जर यावर योग्य वेळेत उपाय केले तर तुम्हाला आराम मिळेल. परंतु, याकडे दुर्लक्ष केले तर प्रकृती गंभीर होऊ शकते. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर त्यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.तुम्ही हा उपाय केला तर लगेच ततुम्हाला आराम पडेल.

करा हा घरगुती उपाय

1. मध

मधामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्यामुळे खोकल्यासाठी ते चांगले असते. तुम्ही तो मध साधा किंवा आल्यासोबत खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला खोकल्यापासून सुटका मिळू शकते. हे लक्षात ठेवा की, लहान मुलांना मध देऊ नका.

2. हळद

हळद ही अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल यांसारख्या गुणधर्मांनी समृद्ध असते. हळदीला आयुर्वेदात औषधी वनस्पती मानतात. यासाठी एक ग्लास संत्र्याचा रस घ्या. त्यात एक चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घालून मिक्स करा. हा रस घेतला तर खोकल्यापासून आराम मिळतो.

3. लसूण

लसणामध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे लसूण भाजून खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि सर्दीला आराम पडतो.

4. आले

आले बारीक करून ते पाण्यात टाकून उकळून घ्यावे. गाळून गरमागरम सेवन करा किंवा कच्चे आले सुद्धा चावू शकता. खोकल्यापासून बरे होण्यास होण्याचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts