TVS Jupiter : आता तुम्ही जबरदस्त फीचर्स आणि 64 kmpl मायलेजसह खूप कमी किमतीत नवीन TVS ज्युपिटर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. कमी किमतीत तुम्हाला उत्तम स्कुटर खरेदी करता येईल. पहा संपूर्ण प्लॅन.
समजा तुम्ही नवीन मायलेज देणारी स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर पर्याय म्हणून तुम्ही TVS ज्युपिटर बेस मॉडेल खरेदी करू शकता. यावर फायनान्स प्लॅन मिळत असून ज्याद्वारे ही स्कूटर अत्यंत कमी डाउन पेमेंटमध्ये खरेदी करू शकता.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर TVS ज्युपिटर स्टँडर्ड व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 77,358 रुपये इतकी आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) आणि ही किंमत रोडवर 89,737 रुपये इतकी आहे.
जाणून घ्या फायनान्स प्लॅन
समजा तुम्ही ही स्कूटर कॅश पेमेंटने खरेदी केल्यास तर तुमचे बजेट जवळपास 90 हजार रुपये असणे खूप गरजेचे आहे. समजा तुमच्याकडे इतके बजेट नसल्यास तर तुम्ही खाली नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे 25 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर ही स्कूटर सहज खरेदी करू शकता.
या स्कूटरसाठी तुमचे बजेट 25 हजार रुपये असल्यास ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरच्या गणनेनुसार, बँक या स्कूटरसाठी 60,203 तुम्हाला रुपयांचे कर्ज देईल ज्यावर वार्षिक 9.7 दराने व्याज आकारण्यात येईल.
TVS ज्युपिटरवर कर्जाची रक्कम मंजूर झाली तर तुम्हाला 25 हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढील 35 महिन्यांसाठी 1,934 रुपये मासिक ईएमआय जमा करावा लागणार आहे. समजा तुम्ही हा EMI महिन्याच्या 30 दिवसांमध्ये विभागला तर स्कूटरसाठी दररोजचा EMI 64 रुपये प्रतिदिन इतका असणार आहे.
मायलेज
TVS Jupiter मध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक CVTI इंजिन देण्यात आले आहे जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित असेल. हे इंजिन 7500 rpm वर 7.88 PS ची पॉवर आणि 5500 rpm वर 8.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ज्युपिटरचे मायलेज 64 किलोमीटर प्रति लिटर असून मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.