ताज्या बातम्या

Twitter Blue Subscription for Android Users : अँड्रॉइड वापरकर्त्यांना वापरता येणार ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन, मोजावे लागणार इतके पैसे..

Twitter Blue Subscription for Android Users : एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.

सध्या ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन चांगलेच चर्चेत आहे. आता हे सबस्क्रिप्शन अँड्रॉइड वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. यात वापरकर्त्यांना अनेक फीचर्सही मिळणार आहेत.

जेव्हा ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु झाले तेव्हा ते फक्त निवडक वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आले होते. ज्यात iOS तसेच वेब वापरकर्त्यांचा समावेश होता. अशातच आता या कंपनीने ही सुविधा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सशुल्क सेवा सुरू केली आहे.

मोजावे लागणार इतके पैसे

ट्विटर हेल्प सेक्शनच्या मतानुसार, हे सबस्क्रिप्शन iOS आणि वेब वापरकर्ते तसेच Android वापरकर्ते वापरू शकतात. Android वापरकर्त्यांना यासाठी $ 11 म्हणजेच सुमारे 900 रुपये प्रति महिन्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे, जे iOS वापरकर्त्यांसाठी निश्चित केले आहे.

याठिकाणी उपलब्ध आहे सबस्क्रिप्शन

अहवालानुसार, हे सबस्क्रिप्शन ऑस्ट्रेलिया, यूके, यूएस, न्यूझीलंड, जपान आणि कॅनडामधील Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु, अजूनही भारतात हे सबस्क्रिप्शन लॉन्च केले नसून लवकरच ते लाँच केले जाईल.

असेही आहेत फायदे

या सब्सक्रिप्शन अंतर्गत, वापरकर्त्यांना इतर अनेक फायदे मिळतात. यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचे ट्विट एडिट करता येईल. तसेच, रीडर मोडमध्ये प्रवेश आणि 1080p व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याचे वैशिष्ट्य असेल. तसेच या वापरकर्त्यांना कमी जाहिराती दाखवल्या जातील. यूजर्सच्या ट्विटला रिप्लाय आणि प्रायॉरिटी मिळेल.

वेब वापरकर्त्यांसाठी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत प्रति महिना $ 8 इतकी आहे. वेब वापरकर्त्याला त्याच्या सबस्क्रिप्शनसाठी वार्षिक $ 84 खर्चावे लागतील. तर, Google Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी $3 कमिशन देईल. यामुळे, Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी प्रति महिना $11 खर्च येतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts