माणुसकी जिवंत ठेवत 10 दिवसांत अडीच लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर – श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा पिंपळगांव रोठा येथील शिंदे कुटूंबावर काळाचा भीषण घाला पडला.कैलास विष्णू शिंदे (वय 42) यांचे 10 दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. कारण चार महिन्यांपूर्वीच त्यांचा मधला मुलगा रावसाहेब (वय 48) यांचे कोरोनाने निधन झाले.

तर मोठा मुलगा शिवाजी (वय 55) यांचे 27 दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. श्री.विष्णू तुळशीराम शिंदे यांच्या कुटूंबावर नाहीतर संपूर्ण कोरठण पंचक्रोशितील ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शिंदे कुटूंबातील मोठा मुलगा शिवाजी, दुसरा रावसाहेब, तिसरा कैलास या तिन्ही मुलांचे पाच महिन्यात थोड्या अंतराने दु:खद निधन झाले.

ही अतिशय महादुर्दैवी आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. ही तिनही मुले अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ होती. शिवाजी यांचे सामाजिक कार्यात योगदान होते. कुटूंबात सामाजिक बांधिलकी खूप होती. हे तिनही कमावते भाऊ कमी वयात निघून गेले.

अजून शिवाजी व रावसाहेब यांच्या मुलांची लग्न बाकी आहेत तर कैलासच्या मुलांचे शिक्षण बाकी आहे. या लहान लेकरांचे खूप लवकर पितृछत्र हरले आता येथून पुढील शिक्षण व मुलींचे लग्नकार्य यासर्व जबाबदार्‍या वृद्ध आजी-आजोबा व त्या तिनही मातांवर पडल्या आहेत. हे खूप मोठे दु:ख आहे.

त्याला सामोरे जावेच लागेल ते सर्वजण जगतीलही पण त्यांना आधार व उभारी देणे ही काळाजी गरज आहे आणि तो प्रयत्न श्री कोरठण ग्रामस्थ, मुंबईकर मित्र व नातेवाईक परिवार करताना दिसत आहे. अंत्यविधीच्यावेळी श्रीक्षेत्र कोरठण गडाचे अध्यक्ष पांडूरंग गायकवाड यांनी कोरठण गडाचे शिवभक्त जालिंदर खोसे यांना व ग्रामस्थांना या परिवाराच्या मदतीसाठी प्रोत्साहित केले.

त्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व समाजाला आवाहन करण्यात आले, त्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला. त्यात मोलाचे योगदान मुंबईकर मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार, स्वत: शिंदे भावकीचाही सिंहाचा वाटा राहिला. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व पुढील कार्यासाठी माणुसकी धावून आली अन् दशक्रिया विधीपर्यंत 10 दिवसांत जवळपास 2 लाख 55 हजार रुपयांचा निधी गोळा केला.

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ढोकेश्‍वर विद्यालय शिक्षक सेवावृंद सुरेश घुले, दिलीप घुले, मंगेश घुले या परिवाराने घेतली. निधी संकलन करण्यासाठी एलआयसी विमा प्रतिनिधी संतोष जाधव, जालिंदर खोसे, भगवान भांबरे, सुदाम कावरे, गोरख जगताप, राहुल घुले, अनिल मेजर घुले यांचे सहकार्य लाभले.

आवाहनांना नंतर अनेकांनी स्वत: मदत करुन माणुसकीय जिवंत आहे, याचा उदाहरण यातून प्रत्यक्षात दिसून आले. कोरठण खंडोबा देवस्थान,

मुंबईकर मित्र परिवार व ग्रामस्थ, नातेवाईकांचे सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले. आणखी मदतसाठी संतोष जाधव इको बँक, अहमदनगर खाते नं.09620100759618 (आयएफसी कोड यूसीबीए 0000962) किंवा फोन पे/ गुगल पे मो.9403988463 येथे जमा करावे.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts