अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : माझे वडील बाळासाहेब ठाकरे भोळे होते, पण मी भोळा नाही. माझ्या वडिलांनीच माझ्या रक्तात हिंदुत्त्व भिनवले आहे. भाजपने त्यांना वेळोवेळी कशाप्रकारे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे.
त्यामुळेच मी भाजपशी धुर्तपणे वागतो, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एका मराठी वृत्तपत्राने ठाकरे यांची मुलाखत घेतली.
त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपवर टीका करताना ते म्हणाले, हिंदुत्वाच्या आडून तुम्ही तुमचे डाव साधत होतात. त्याकडे बाळासाहेब ठाकरे यांनी कानाडोळा केला, पण मी तसा कानाडोळा करणार नाही.
हिंदुत्वाच्या नव्या खेळाडुंकडे लक्ष देत नाही. यांच्याकडून कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ केला जात आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत.
फुकटात करमणूक होत असेल तर का नाही पाहायची. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.